Ad will apear here
Next
रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप
सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातर्फे कारखान्याच्या सभासदांना अल्प दरात साखरेचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सणासुदीच्या दिवसांत घरपोच साखर मिळाल्याने सभासदांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गावात जाऊन शिंदे कारखान्याच्या सभासदांना साखरेचे वाटप करण्यात येत आहे. रोपळे व परिसरातील आष्टी, येवती, खरातवाडी, बाभूळगाव व मेंढापूर येथील सभासदांना साखर अल्पदराने देण्यात आली. या वेळी नितीन कदम, संभाजी पवार, अमर पवार, कारखान्याचे चिटबॅय अरुण कोरके, शेती विस्तार अधिकारी भीमराव कुसुमडे, विलास भोसले, नागनाथ माळी, महेश कदम, चंद्रकांत कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सुमारे २५० सभासदांना प्रत्येकी ५० किलो अल्प दराने देण्यात आली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZTEBS
Similar Posts
सोलापूरला ऊस तोडणी कामगारांसोबत दिवाळी साजरी सोलापूर : माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांनी ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांबरोबर दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपली.
माढा लोकसभा मतदारसंघात ५६ टक्के मतदान सोलापूर : लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत माढा मतदारसंघात ५६ टक्के मतदान झाले. सोनाबाई मोतीराम खरे या ११० वर्षे वयाच्या ज्येष्ठ महिला मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language